संस्थेबद्दल माहिती

श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम (ट्रस्ट), कोल्हापूर नोंदणी क्र. ई-३३८८/कोल्हापूर

  • श्री सुहास मधुकर जोशी (संस्थापक – अध्यक्ष)
  • श्री दिगंबर कृष्णाजी जोशी (उपाध्यक्ष)
  • श्री सचिन विद्याधर ठाणेकर (खजानिस)
  • श्री केदार वसंतराव मुनिश्वर (सचिव)
  • श्री नंदकिशोर पद्माकर जिल्हेदार (सहसचिव)
  • सदस्य – श्री पद्माकर बाजीराव जिल्हेदार
    श्री श्रीनिवास केशव चिखलीकर

महाराष्ट्रातील सर्वात जुने व प्रथम स्थापित “श्री अनघादत्त मंदिर” अशी ओळख असलेल्या या स्थानाची प्रतिष्ठापना इ स २००८ साली श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपादश्रीवल्लभ स्वामी यांचे मातुल कुळातील ३३ वे वंशज प पू श्रीमल्लादि गोविंद दीक्षितुलु यांचे हस्ते कोल्हापूर येथे श्री सुहास जोशी यांचे ठिकाणी करण्यात आली. याच स्थानाच्या विस्ताराअंतर्गत आता भव्य तीन मजली इमारतीमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम या नोंदणीकृत संस्थेची स्थापना करण्यात आली.

या प्रकल्पामध्ये भगवान श्रीदत्तात्रेयांची उपासना, श्रीविद्यागुरु श्री दत्तात्रेयप्रणित श्रीविद्या उपासना आणि योगीराज प पु श्री गुळवणी महाराज प्रदत्त शक्तिपात साधना असे आगळेवेगळे वैशिष्ट्य एकवटले आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतभरातील व आखिल विश्वातील श्रीविद्या व शक्तिपात साधकांना याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी संस्थेकडून कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिरापासून जवळच निसर्गरम्य ठिकाणी जमीन विकत घेण्यात आली असून या भूमीवर सर्व सोयीनियुक्त इमारत उभी करणेत येईल. त्यामध्ये भगवान श्रीअनघादत्तात्रेयांची सर्वांगसुंदर प्रतिमा, श्रीयंत्र व श्रीवल्लभा महागणपति यांचे विग्रह विराजमान असतील. याशिवाय येथे ध्यानकक्ष, यतीनिवास, साधकनिवास, गोशाळा, ग्रंथालय इ. निर्मितीचे संकल्प आहेत. 

या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मोठा खर्च अपेक्षित असून या गुरुकार्यामध्ये प्रत्येकाने यथाशक्ती दान करावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. या गुरुसेवेचा लाभ निश्चितच मोठ्या संख्येने साधक लोकांना होईल यात शंका नाही.

Mission

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Vision

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Values